Tuesday, December 24, 2024

/

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मराठी विद्यार्थी संघटना कार्यरत

 belgaum

वेळोवेळी मराठी भाषिक विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, कॉलेज मधील तक्रारी, शिष्यवृत्ती, प्रवेश, परिवहन, पास यांच्या तक्रारी सोबतच मराठी भाषिक असल्याने कोणत्याही सरकार दरबारी लक्ष दिले जात नाही, सोबतच मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्यास सुद्धा अडचणी निर्माण केल्या जातात, या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मूलभूत अधिकार विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मराठी विद्यार्थी संघटनेची गरज आहे असे सिद्धार्थ यांनी मांडले.
मराठी विद्यार्थी संघटनेची प्राथमिक बैठक आज दिनांक 17/10/2019 रोजी जत्तीमठ येथे आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी अश्वजित चौधरी होते.प्रारंभी सिद्धार्थ चौगुले यांनी स्वागत करुन प्रस्तावित केले आणि मराठी विद्यार्थी संघटना का सुरू केली जात आहे याचा तपशील दिला.

यावेळी अध्यक्षस्थानी असलेल्या अश्वजित चौधरी यांनी या प्राथमिक बैठकीनंतर सर्व बेळगाव, खानापूर भागातील कॉलेज मध्ये जनजागृती करून आणि विभागवार बैठका आयोजित करून मराठी विद्यार्थी संघटनेची व्यापक बैठक घेऊन लवकरच संघटना स्थापन केली जावी असा ठराव मांडला आणि तो एकमुखाने मान्य करण्यात आला.

यावेळी विविध समस्या आणि विषयावर मंदार चौगुले, महंतेश कोळूचे, ओमकार पाटील, अक्षता पाटील, स्वानंद रेडेकर, सर्वोत्तम पाटील आदींनी आपले विचार मांडले.यावेळी जोतिबा पाटील, अशिष कोचेरी, स्वप्निल मेलगे,राहूल पाटील, महेश पाटील,प्रविण कसारलेकर, शुभम कोले, शुभम माळी, ओंकार पाटील,शुभम पाटील, श्रीनिवास धर्मुचे,सौरभ पाटील, नील तवनशेट्टी, विजय मोहिते व आदी विविध कॉलेज मधील विध्यार्थी उपस्थित होते.युवा समिती नंतर मराठी विद्यार्थी संघटना देखील मराठीसाठी हळूहळू कार्यरत होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.