Sunday, November 17, 2024

/

लोक वर्गणीतून बांधणार तलावाची भिंत

 belgaum

कपिलेश्वर मंदिरा मागील तलावाची संरक्षण भिंत लोक वर्गणीतून बांधण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला आहे मनपा अथवा प्रशासनाला अनेकदा विनवणी करून देखील याकडे दुर्लक्ष झाल्याने या भागातील युवकांनी लोक वर्गणी काढून संरक्षण भिंत स्वतः दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकामा मंदिर समोरील तलावाची भिंत धोकादायक बनली आहे रस्ता खचून धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे परिसरातील लोकांना रहदरीसाठी अडचण निर्माण झाली आहे. इथून ये जा करण्यासाठी लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून समस्या असून याकडे मनपाने डोळेझाक केली आहे.

स्थानीक प्रशासना कडे वेळोवेळी तक्रार केली पण योग्य प्रतिसाद देण्यात आला नाही उत्तरेच्या विद्यमान आमदाराकडे समस्या निवारणासाठी साकडे घातले आमदारांनी पाहणी करून केवळ आश्वासन दिले आहे या व्यतिरिक्त सर्वच लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केले आहे.

सर्व स्थानिक वृत्तपत्रामध्ये देखील ही वेळोवेळी समस्या मांडली गेली मात्र अजूनही प्रशासन गप्प आहे तलाव परिसरामध्ये कोलकांमा मंदिर असल्याने भाविकांना रहदारीची समस्या होते. यावेळच्या पावसमुळे समस्या अधिक गंभीर झाल्याने परिसरातील युवक आणि नागरिकांनी लोकवर्गणीतून या तलावाच्या भिंतीची बांधणी करण्याचे ठरविले आहे. इच्छुकांनी या कार्यात हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.