सायकल चालवा मादक वस्तूंचे सेवन टाळा असा सामाजिक संदेश देत एक हजार हुन अधिक की मी अंतर सायकल चालवत केरळचे तिघे पोलीस अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत.
अंमली पदार्थ सेवनाच्या विरोधात जनजागृती करत सायकल चालवत हे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत.गेल्या पाच ऑक्टोबर रोजी कोची पोलीस आयुक्त व आय जी पी विजय साखरे यांनी सायकल रॅलीची सुरुवात केली होती.say no drugs, yes to cycling हा सामाजिक संदेश देत सायकल चालवत या अधिकाऱ्यांनी ही मोहीम सुरू केली आहे.
कोची,तिरुचुर,पालखड़,कोयम्बटूर आरोड सेलम कृष्णगिरी बैंगलुरु शिरा चित्रदुर्ग दावणगेरे हुबळी मार्गे एक हजार की मी सायकल प्रवास करत बेळगावात दाखल झाले आहेत.ते बेळगावहुन पुढे एक हजार की मी प्रवास करणार आहेत.केरळचे मटांचरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी एस नवाज,अंबलापूर पोलीस स्थानकाचे व्हीनिल एन के यांच्या सह तोटपल्ली कोस्टल पोलीस स्टेशनचे अॅलेक्स वर्कि यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
बेळगावचे आय जी पी राघवेंद्र सुहास डी सी पी सीमा लाटकर,पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर, वन अधिकारी संगमेश प्रभाकर आदींनी या तिन्ही सायकल पटू पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत केले.