कित्तूर राणी चन्नमाचे माहेर काकती येथे कित्तूर ज्योतीचे आगमन झाले.यावेळी ज्योतीच्या स्वागतावरून खासदार अण्णा साहेब जोल्ले आणि जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांच्यात शाब्दिक चकमक झडली.
सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि मंत्री असताना ज्योतीचे स्वागत करण्याचा मान आमदार सतीश जारकीहोळी यांना दिल्याबद्दल जोल्ले यांनी नाराजी व्यक्त केली.खासदार आणि राज्याचे मंत्री यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वागतापासून डावलल्याची तक्रार जोल्लेनी केली.
कित्तूर उत्सवाला कित्तूर येथेंआजपासून प्रारंभ झाला.
इंग्रजांविरुद्ध लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमा हिच्या स्मरणार्थ दरवर्षी कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात येते.पालकमंत्री जगदीश शेट्टर,महिला बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले,खासदार अण्णा साहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत कित्तूर उत्सवाला प्रारंभ झाला.
प्रारंभी मान्यवरांनी राणीच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले.
नंतर जगदीश शेट्टर यांच्या हस्ते कित्तूर संस्थानचा ध्वज फडकविण्यात आला. कित्तूर येथे निघालेल्या शोभायात्रेत डोक्यावर कलश घेऊन सुवासिनी सहभागी झाल्या होत्या.शोभायात्रेत धनगरी ढोल,महिला ढोल पथक,झान्ज पथक आणि चितरविचित्र मुखवटे परिधान केलेली पात्रे मिरवणुकीत सहभागी झाली होती.