कडोलीत लाखो रुपये खर्चून 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र ही योजना कमिशन मुळे रंगात पडली आहे. मागील काही महिन्यापासून या योजनेचा बोजवारा उडाला असून संबंधितांनी मात्र आपले कमिशन खाऊन या योजनेकडे पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असून पाण्यासाठी पावसाळ्याची भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे.
कडोली येथील चंद्रशेखर आजाद गल्ली यासह इतर भागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काही नेत्यांना याचे कमिशन मिळाल्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. विशेष करून जिल्हा पंचायत योजनेतून हा निधी मंजूर झाला असले तरी संबंधित सदस्यांनी याकडे दुर्लक्ष करून नागरिकांचे हाल करण्यावर भर दिला आहे.
कडोली येथे मागील पाच ते सहा महिन्यापूर्वी 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मात्र ही योजना योग्यरीतीने राबविण्यात न आल्यामुळे अनेकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक घरपती बसविण्यात आले असले तरी त्याला पाणी मात्र येत नाही. जिल्हा पंचायत निधी ग्रामपंचायतीने द्यावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोवीस तास पाणीपुरवठाच्या आश्वासन देणारे आता मात्र गायब झाले आहेत.याचा फटका मात्र कडोली परिसरातील नागरिकांना बसला आहे.
लाखो रुपये खर्च करून कडोली येथे काही गल्ल्यांमध्ये घरपोच नळ देण्यात आले आहेत. मात्र त्या नळांना पाणीच नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष करून पाणीपुरवठा करण्यासाठी घालण्यात आलेल्या पाईप व त्यावर माती टाकण्यात आली .
असली तरी त्याबद्दल याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे येता जाताना नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत मधून सहकार्य लाभत असले तरी आणि जिल्हा पंचायतच्या उपाध्यक्षांनी मटका गावातील समस्याकडे साफ दुर्लक्ष करून नागरिकांची गैरसमज करणार भर दिल्याचे बोलले जात आहे. यापुढे तरी जिल्हा पंचायत च्या उपाध्यक्षांनी आपल्या स्वतःच्या गावाकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे