बेळगाव तालुक्यातील चंदगड(अष्टे)गावची सुपुत्री व आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू रोहिणी पाटील हिची जुडो कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य सरकराच्या युवजन आणि क्रीडा खात्याने ही निवड केली आहे.
रोहिणी या आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू असून नुकताच त्यांनी पटियाला एन आय एस मधून प्रशिक्षक कोर्स पूर्ण केला होता जुडो मध्ये दिलेले योगदान पाहून सरकारने त्यांनी प्रशिक्षक पदी नेमणूक केली आहे.2008 नेपाळ मध्ये झालेल्या साऊथ एशियन जुडो चॅम्पियनशिप गोल्ड मेडल,येमेन मध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड जुडो स्पर्धेत कांस्य पदकासह अनेक राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत पदकांची कमाई केली होती. त्यांना 2008 मध्ये एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचे शिक्षण एम ए एम फिल पर्यंत झाले आहे. कमी वयात त्यांनी जुडो मध्ये मिळवलेल्या यशामूळे रोहिणी हिने प्रशिक्षक पदा पर्यंत मजल मारली आहे.बेळगावातील युवा होतकरू जुडो खेळाडूंना रोहिणी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.त्यांच्या यशा मूळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बेळगावातील अनेक सिनियर खेळाडू प्रशिक्षक बनत आहेत.सिनियर बॉडी बिल्डर सुनील आपटेकर रेल्वे टीम इंडियाचे कोच बनले आहेत त्यांच्या बरोबर बेळगावातून वेगवेगळ्या खेळात कोच बनणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.