आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांना आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल वर्णकला चित्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.संतोष फोटो स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ छायाचित्रकार आणि चित्रकार वाय. जी.बिरादार आणि नागेश चिमरोल यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
उरुग्वेमध्ये कलाप्रेमी लोकांची संख्या अधिक आहे.कलाकारांना तेथे खूप मान दिला जातो.कलेचे कौतुकही तेथे होते.प्रदर्शनाला आणि जलरंग चित्राच्या प्रात्यक्षिकाला तेथे खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अनुभव विकास पाटणेकर यांनी यावेळी सांगितला.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांना अलीकडेच उरुग्वे मधील मॉंटेव्हिडीओ येथे आर्टिस्ट ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.वर्ल्ड ट्रेड सेंटरचे एक्झिक्युटिव्ह इन्व्हेस्टमेंट हेड मारियानो कोलाझो यांच्या हस्ते शानदार समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत विकास पाटणेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.विकास यांच्या जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके देखील विविध शहरात आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाला आर्किटेक्ट कुलदीप हंगिरकर, छायाचित्रकार संतोष पाटील,सागर मुतगेकार,चित्रकार वाणी रेवणकर नंदगडकर,विलास अध्यापक,गौतम नेसरीकर,विलास गौंडाडकर आणि कलाप्रेमी उपस्थित होते.