डॉक्टर यांना देवाची उपमा दिली जाते. जेव्हा सर्वकाही मनुष्याच्या हातात नसते तेव्हा डॉक्टर आणि देव यांच्यावर भरोसा ठेवला जातो. मात्र काही वेळा डॉक्टरांच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा जीव जातो तेव्हा मात्र डॉक्टरला देव नाही तर राक्षस असे संबोधले जाते. अशीच घटना बेळगाव येथे घडली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गावोगावी फिरून उपचार करणाऱ्या भोंदू डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनमुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी यमकनमर्डी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.बेळगावच्या रजपूत बंधू शाळेत आठव्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी विकास भीमराव जक्कावी या विद्यार्थ्याचा के एल ई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत विकास मूळचा बेळगावचा असून तो रजपूत बंधू शाळेत आठवीत शिकतो त्याचे वडील हॉटेल मध्ये काम करतात.
विकास हा बुधवारी बिदरोळी या आपल्या आजीच्या गावी गेला होता.त्यावेळी त्याला ताप आला.ताप आल्यावर गावात येणाऱ्या एका डॉक्टरला दाखवले असता त्याने दोन इंजेक्शन दिली.नंतर तो गुरुवारी आजी बरोबर यल्लम्माला गेला.गुरुवारी इंजेक्शन दिलेल्या जागेला सूज आली. ते पाहून त्यावर एक गोळी लावण्यात आली.नंतर विकासाच्या दोन्ही पायातील शक्ती गेली.त्यामुळे घाबरलेल्या घरच्या लोकांनी त्याला शुक्रवारी दुपारी बारा वाजता के एल ई मध्ये दाखल केले.पण त्याचे दुपारी तीन वाजता निधन झाले.
बोगस डॉक्टर याने केलेल्या इंजेक्शनमुळे त्याला रिएक्शन झाली आणि डोंगरावर यल्लम्मा रेणुकादेवी समोरच त्याची तब्येत खालावली. त्यामुळे तातडीने त्याला बेळगावला हलविण्यात आले. बेळगावातील केएलइ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता तो दगावला आहे.संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.