इचलकरंजी येथील प्रसिद्ध चित्रकार दिलीप दुधाणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन जॉन्स गॅलरी संगमेश्वर नगर येथील आर्ट गॅलरीमध्ये भरले आहे.प्रख्यात चित्रकार जॉन आणि त्यांच्या पत्नी आग्नेस फर्नांडिस यांच्या अथक प्रयत्नाने बेळगावमध्ये उत्कृष्ट आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे.
चित्रकार दिलीप दुधाणे यांनी चित्रकलेत जॉन फर्नाडिस यांच्याकडून त्यांनी कलेची प्रेरणा घेतली आहे .दिलीप यांची वैचारिक बैठकही जॉन यांच्याशी बरीच मिळती जुळती आहे.
दिलीप यांनी मुंबई आणि पुणे येथे चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे.आर्ट सोसायटी ऑफ इंडिया,ललित कला अकादमी नवी दिल्ली,अन्युअल कॅम्लिन एक्झिबिशन,द कोबाल्ट आर्ट शो दुबई येथे त्यांची प्रदर्शने झाली आहेत.अनेक महत्वाचे पुरस्कार देखील त्यांना लाभले आहेत.दि.२० ऑक्टोबर पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे.