वडगांव येथील विसर्जन कुंडाशेजारील विहीर शनिवारी सकाळी कोसळली आहे. कारभार गल्ली आणि नाझर कॅम्प भागाला एक वेळ पाणी पुरवणारी सरकारी विहीर होती.
मनपाने नव्याने बांधलेल्या गणेश विसर्जन कुंडाच्या बाजूला असलेली 100 वर्षाहून अधिक काळ जुनी विहीर कोसळली आहे.या विहिरीला वडगांव मधील 12 गढगढयाची विहीर असं देखील म्हटलं जातं होत.
कुरुंदवाड सरकारच्या काळातील ज्यावेळी माधवपूर वडगांव ला येळ्ळूर तालुका होता येळ्ळूर तालुक्याच्या अखत्यारीत सदर विहीर येत होती इतकी जुनी विहीर शनिवारी सकाळी कोसळली आहे. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनो देखील या कोसलेल्या विहिरींची पहाणी केली.
विहिरींच्या बाजूला विसर्जन कुंड निर्माण केल्याने बाजूला असलेले दगडी बांधकाम कमकुवत झाले होते . यावर्षी झालेल्या पावसात खचली होती ब्रिटिश काळात बनलेली ही ऐतिहासिक विहीर होती विहिरीचे दगडी बांधकाम होते त्यावर असलेल्या दगडावर माधवपूर वडगांव कुरुंदवाड सरकार असा उल्लेख होता त्यामुळे ब्रिटिश कालीन जुनी विहीर असल्याचे पुरावे होते.