शहराबरोबरच ग्रामीण भागातील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या मुतगा येथे चार घरफोड्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यात एका पोलिससाचे ही घर फोडण्यात आल्याचे दिसून आले आहे. मात्र काहीनिच पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुतगा येथील पाटील नगर परिसरात तसेच साई नगर परिसरात चार घरफोड्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. माजलेल्या टोळक्याने हा कारनामा केला असून या भागात वारंवार घरफोड्या आणि चोऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. काहींनी पोलिसांकडे तक्रार दिली असली तरी काहीनि याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र अशा प्रकारांमुळे यांचे फावत असल्याचे दिसून येत आहे.
पाटीलनगर येथील उदय पाटील यांच्या घरातील दहा तोळे सोन्याचे दागिने लांबविले आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याचबरोबर पंचवीस हजार रोख रक्कम ही लांबविण्यात आल्यास असे सांगण्यात येत आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारांवर रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याचबरोबर या परिसरात असणाऱ्या साईनगर येथेही एका रहदारी पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातही चोरी झाली आहे. 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविण्यात आले असून मारीहाळ पोलीस स्थानकात या प्रकरणी नोंद करण्यात आले आहे. असे असले तरी दिवसाढवळ्या या घरफोड्या होत असून या टोळक्यांनी जाणून आणि पारख ठेवून हा कारनामा केल्याचे उघडकीस येत आहे. अशा परिसरातील नागरिकांनीही नजर ठेवणे गरजेचे आहे. याचबरोबर या परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे तरी अशा चोरट्यांवर पोलिसांनी नजर ठेवून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.मारिहाळ पोलीस निरीक्षक विजय शिंनूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मालतेश बसपुर यांची नियुक्ती झाली आहे नवीन पोलीस निरीक्षकांनी या चोऱ्या वर आळा घालावा अशी देखील मागणी वाढू लागली आहे.