वळीव पावसाच्या दणक्याने आळवण गल्लीतील एक गरीब कुटुंब बेघर झाले आहे.सतत होत असलेल्या परतीच्या वळीव पावसाने घरांची पडझड सुरूच आहे. आळवण गल्ली येथील महंमद सादिक अब्दुल हमीद उचगावकर असे घर पडलेल्या कुटुंब प्रमुखाचे नाव असून कमीत कमी चार लाखांचे नुकसान झाले आहे.
आळवण गल्लीत मातीच घर आहे पावसाने ते हळूहळू कोसळत होते रविवारी या घराचा पूर्ण भाग कोसळला आहे.या कुटुंबात पाच सदस्य असून हे कुटुंब बेघर झाले आहे.ओळखीच्या रिक्षा चालकाच्या घरी तात्पुरता आश्रय मिळाला आहे.शासनाने या कुटुंबाला मदत देऊ राहण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.
आगष्ट महिन्या नंतर बेळगाव शहर व तालुक्यात एक हजार हुन अधिक घरे कोसळली आहेत.शासना कडून पडलेल्या घरांचा सर्व्हे सुरू आहे ए बी आणि सी कॅटेगरी करून पडझड झालेल्या घरांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू आहे.राज्य सरकारच्या सुधारित आदेशानुसार ए कॅटेगरी 75 टक्के ते 100 टक्के नुकसान झालेल्या घराला पाच लाख रुपये,25 टक्के ते 75 टक्के नुकसान झालेल्या घरांना दोन लाख तर 25 टक्क्यांहून कमी नुकसान झालेल्या घरांना 50 हजार नुकसान भरपाई दिली जात आहे.