वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या लाईनमनचा उचगाव येथे सत्कार करण्यात आला. उचगाव मराठी साहित्य अकादमी आणि मार्कंडेय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लाईनमनचा सत्कार करण्यात आला.
वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी काळ वेळ न बघता सेवा बजावणारे हेस्कोमचे लाईनमन दुर्लक्षितच असतात.सगळ्यांची घरे प्रकाशाने उजळूदेत म्हणून रात्रंदिवस सेवा बजावणारे लाईनमन म्हणजे हॅस्कोम आणि जनता यांच्यातला महत्वाचा दुवाच म्हणावा लागेल.
गेल्या आठ वर्षांपासून गणपती आणि दिवाळीच्यावेळी फटाक्यांचा खर्च टाळून लाईनमनचा सत्कार करण्याची परंपरा उचगाव येथील संस्थानी सुरू केली आहे.सत्कार समारंभाला लक्ष्मण होनगेकर,एम टी मरुचे, कृष्णाजी कदम पाटील,एन ओ चौगुले,बी एम अनगोळकर आदी उपस्थित होते.