मुसळधार पावसाने कहर केला असून संकेश्वर येथे वाहने वाहून गेली आहेत.बेळगाव शहरात देखील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे.संपूर्ण जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.संकेश्वर येथे लक्ष्मी मंदिरा जवळील ओढ्याला पूर येऊन दुचाकी आणि चार चाकी वाहने वाहून गेली आहेत.पुणे बंगलोर महामार्गाला देखील अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले असून तेथील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
बेळगाव शहरात शिवाजी नगर,शास्त्री नगर ,मराठा कॉलनी येथे रस्त्यावर पाणी आले आहे.गेल्या काही तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे दिवाळी तोंडावर आलेली असताना देखील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.
मुसळधार पावसामुळे जनतेच्या मनात भीती निर्माण झाली असून पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी सायंकाळी शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा बेळगाव शहरातील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. शनिवारी रात्रभर पाऊस झाला होता रविवारी दिवसभर पावसाचे प्रमाण कमी होते मात्र सायंकाळी नंतर पावसाने रौद्र रूप धारण करत पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. बेळगाव शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.मंडोळी रोड शिवाजी नगर शास्त्रीनगर भागात रस्त्यावर पाणीच पाणी झालेय.