नुकतीच बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी तालुका पंचायत मधील तब्बल 158 कर्मचाऱ्यांची बदली केली. यामुळे एकच खळबळ माजली. जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा सर्वे सुरू असताना त्यांनी ही कारवाई केली आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र आता जिल्ह्यातील ग्राम पंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातही त्यांनी सर्जिकल स्ट्राइक करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामपंचायत मधील सेक्रेटरी, क्लार्क व संगणक ऑपरेटर यांची बदली करणे गरजेचे बनले आहे. कित्येक वर्षापासून सेक्रेटरी क्लार्क व संगणक ऑपरेटर एकाच ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे ग्राम विकास अधिकारी पेक्षा त्यांच्या हाताखाली असणाऱ्यांच्या अधिक फावत आहे. काही सेक्रेटरी क्लार्कने तर पुढील ग्रामपंचायतचा भ्रष्टाचारी बनवण्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचीही बदली करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्राम पंचायत मध्ये सेक्रेटरी क्लार्क संगणक ऑपरेटर पाणीपुरवठा करणारे कर्मचारी हे कित्येक वर्षापासून एकाच ग्रामपंचायतीत असल्याने मोठ्या भानगडी करण्यावरच भर देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काही सेक्रेटरी यांनी ग्राम विकास अधिकारी पेक्षा बक्कळ माया जमवण्याची खात्रीलायक माहिती आहे. अशा परिस्थितीत केवळ तालुका पंचायतमधील कर्मचाऱ्यांची बदली न करता ग्रामपंचायतमध्ये आता सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उद्योग खत्री योजनेअंतर्गत काम करत असणाऱ्या 112 तांत्रिक संयोजक आणि तांत्रिक सहाय्यक, 10 एम आय एस संयोजक आणि संयोजक यांच्यासह एकूण 158 कर्मचाऱ्यांची एका तालुक्यातून अन्य तालुक्यात बदली केली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजले आहे. असे असताना ग्रामपंचायत मात्र सुखात नांदत असणार्या सेक्रेटरी क्लार्क व इतर कर्मचाऱ्यांची ही बदली केल्यास जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर आळा बसण्यास विलंब लागणार नाही, अशी आशाही व्यक्त होत आहे.