हिरे आणि सोने-चांदी व्यवसायात मोठा फायदा असल्याचे सांगून कोल्हापूर येथील दोघा उद्योगपतींना फसविणाऱ्या बेळगाव येथील गोल्ड म्युझियमच्या मालकाला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे बेळगाव शहर आणि परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गोल्ड म्युझियमचे मालक संशयित राजू इस्माईल बेग राजू बेग (वय 53 राहणार बेळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. हे त्यांनी सोने-चांदी व्यवसायात मोठा नफा आहे असे आमिष दाखवून उद्योगपती जॉन बारदेस्कर आणि दिलीप रामचंद्र मोहिते यांच्याकडून पाच कोटी रुपये गुंतवून घेतले. मात्र त्यांची रक्कम परत न दिल्याने संबंधित उद्योगपतींनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या तक्रारीवरून कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एस राउळ यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची पत्नी फिरोझा बेग सध्या फरार झाली आहे.
राजारामपुरी मेन रोड सातव्या गल्लीत गोल्ड म्युझिक नावाने अलिशान सराफी दुकान त्याने सुरू केले आहे. सुरुवातीला मोठा नफा देत भागीदार यांचा विश्वास संपादन करून काही दिवसांनी गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद केल्याने बेग वर्तवणुकीत बाबत शंका आली. बारदेस्कर व मोहिते यांनी राजारामपुरीतील दुकानात बाबत चौकशी केली असता तेथे खोटे सोने ठेवल्याचे आढळून आले.
बारदेस्कर व मोहिते यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी राजाराम पोलीस स्थानकात संशयित राजू बेग व त्याची पत्नी फिरोजा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले. फसवणुकीचा आकडा पाच कोटीच्या वरती असल्याने हा खटला गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. आता आपली खैर नाही असे वाटू लागल्याने संशयिताने मुंबईतील हायकोर्टात जामीन साठी अर्ज केला. न्यायालयाने त्याला 1 कोटी 50 लाख रुपये भरण्याची मुदत दिली होती. मात्र त्यांनी ती भरली नसल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळला व पोलिसांना पुढील कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार राजू बेगेच्या खात्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे बेळगाव परिसरात एकच खळबळ माजली आहे.