महानगरपालिकेतर्फे शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी महिन्याला लाखो रु खर्च केले जातात पण शहरातील कचऱ्याची उचल मात्र व्यवस्थित होत नाही हे मंगळवारी दुर्गा माता दौडीच्या निमित्ताने दिसून आले आहे.दौडीच्या मार्गावर आदले दिवशी रात्री साफसफाई केली जाते पण मंगळवारी जे दृश्य पाहायला मिळाले ते कोणत्याही सुजाण नागरिकाला संताप येण्यासारखेच होते.
शनिवार खुट रिसलदार गल्ली मार्गावर कचरा पसरला होता आणि त्यातून मार्ग काढून दौडीत सहभागी झालेल्यांना जावे लागले.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे तीनतेरा वाजले आहेत असेच हा फोटो दर्शवतो.अधिकाऱ्यांचा कचरा कंत्राटदारवर वचक नाही.त्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे कोणाचेच लक्ष नाही.मनपा अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणा कोणालाही संताप येण्यासारखा आहे.
आरोग्य खात्याचे अधिकारी शहरात कधी फेरफटका मारून कचऱ्याची उचल व्यवस्थित होते की नाही हे कधीच पाहत नाहीत.कचरा उचल करणारे कंत्राटदार आणि अधिकारी यांचे साटेलोटे असल्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
बेळगाव मनपाचे कृत्य संताप येण्या सारखेच आहे सुस्त मनपा अधिकाऱ्यांना कोण वठणीवर आणणार?ही चिंता जनतेला सतावत आहे.मनपा म्हणजे जनतेची पालक आहे जनतेच्या सगळ्या समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी मनपाची आहे असे असताना दौड सारख्या धार्मिक कार्यक्रम मार्गातून कचऱ्याची उचल होत नसेल तर दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणूनच अनेक जण म्हणताहेत मनपा माझा तुझ्यावर भरोसा न्हाय!
More than 50% Street lights are Off in the city and suburb.No response to the complaints and regarding cleanliness God only Save the people.