नुकतीच बेळगाव जिल्ह्यात पूर परिस्थितीने अनेक जण हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना आपले जीवन कंठणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात पूर परिस्थितीचा फटका चांगलाच बसला असून अनेकांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्यासाठी 500 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून ते तातडीने नुकसानग्रस्त नागरिकांना द्यावे अशी सूचना केली आहे.
तसे पाहता बेळगाव जिल्ह्यात दहा हजार कोटीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक संस्थांनी मदत केली आहे. त्यामुळे सध्या तरी राज्य सरकारच्या वतीने 500 कोटी देण्यात आले आहे . जिल्हा पंचायतीच्या सभागृहात बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. बी एस येडीयुराप्पा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने हा निधी संबंधित नुकसानग्रस्त आणि पूरग्रस्तांना पोचवावा असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता अधिकारीही कामाला लागले आहेत.
पूर परिस्थितीमुळे बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन अनेक अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. जे कोणी अशा कामात हलगर्जीपणा केल्यास त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे यापुढे तरी संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अन्यथा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिला आहे.
सध्या बेळगाव जिल्ह्याबरोबरच अनेक जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर काही जण अजूनही निवारा केंद्रात आहेत. अशांना आपली घरे आणि त्यांची इतर वस्तू देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र काहींनी त्याचा दुरुपयोग केला आहे. सरकारी अधिकारी योग्य त्या माणसाला नुकसानभरपाई देत नसल्यामुळे अनेकांच्या समस्या निर्माण झाले आहेत. असली फाजील गोष्ट केलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी जिल्हा पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.