मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांची बेळगाव भेट वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे.रयत संघटनेचे एक शिष्टमंडळ सरकारी विश्रामगृहात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास गेले होते तर दुसरे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार म्हणून बाहेर थांबले होते.त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.पण काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे होऊन मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला.
सरकारकडे पैसे नाहीत तर पुरग्रस्तांची पाहणी करण्याचे नाटक कशाला करतात असा सवाल रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.यावेळी पोलीस आणि रयत संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक देखील झडली. अखेर जयश्री आणि काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
निवेदन देण्यासाठी गेलेल्यांना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी तुम्ही सांगाल तसे होणार नाही असे उत्तर दिले.त्यामुळे निवेदन देण्यास गेलेले रयत संघटनेचे पदाधिकारी त्यांच्यावर चिडले.
आता उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी जिल्ह्याची मागणी करून जिल्हा विभाजनाच्या वादात भर घातली आहे.पत्रकारांशी बोलताना त्यांनी अथणी जिल्ह्याची मागणी केली.सध्या गोकाक किंवा चिकोडी जिल्हा विभाजनाचा विचार नाही.सध्या हा विषय बाजूला ठेवण्यात आला आहे.ज्यावेळी जिल्हा विभाजनाचा विषय येईल त्यावेळी अथणी जिल्ह्याचीही मागणी असणार असल्याचे त्यांनी सांगितले.