शेतकरी पाळलेल्या जनावरांना आपल्या मुलांबाळा प्रमाणेच वागणूक देत असतात. अशाच मुचंडी ता. बेळगाव येथील शेतकऱ्यांने जसा घरातल्या मुलामुलींचा वाढदिवस साजरा करतात त्याहूनही अधिक उत्साहात घरातील गायीचा वाढदिवस साजरा केला आहे.
मल्लाप्पा सुगणी पाटील असे या मुचंडी गावातील शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांनी 25 वर्षे पाळलेल्या गायीचा मोठ्या थाटात वाढदिवस करत पाळीव प्राण्या बाबतीत आपलं प्रेम दाखवून दिलेय. मल्लापा पाटील हे मुचंडी गावचे पाटील असून ते प्रगतशील शेतकरी आणि देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत.
25 वर्षात या गोमातेने 8 शर्यतीचे बैल दिले .या शिवाय मुचंडी गावातील प्रमुख मंदिरांचा वास्तू गृह प्रवेश याच गोमातेने केला आहे. इतकेच काय तर गावातील 300 हुन गृहप्रवेशासाठी याच गायीचा वापर झाला आहे. गेल्या 25 वर्षात आपल्या मालकाना भरपूर फायदा करून दिल्याने तिचे उपकार फेडण्याचा प्रयत्न म्हणून चक्क वाढदिवस केक कापुन साजरा केलाय.
यासाठी गावातील शेतकऱ्यांना आमंत्रण देण्यात आले होते. सुहासिनी महिलांनी मंगल कलश घेऊन गावच्या देवांची पूजन केले व गोमातेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा झाला .सर्वांना प्रसाद म्हणून भोजनाची सोय करण्यात आली होती.
*गाय का मान ही राम का मान है..*
*राम का जन्म गौ का ही वरदान है..*
*गाय के वंश से भूमि हंसती सदा..*
*गाय में राष्ट्र की शान वसती सदा..* असे म्हणत गोमाते बद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्याचे नक्कीच कौतुक करायला हवे।