- मागील वर्षी बेळगावात झालेल्या कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तब्बल 13 कोटी 85 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.आर टी आय कार्यकर्ते भिमाप्पा गडाद यांनी माहिती अधिकारा द्वारे मिळवलेल्या माहितीत सरकारने ही माहिती दिलीय.2018 च्या दहा दिवसांच्या अधिवेशनात 40 तास 25 मिनिटांचे सत्र चालले होते.
आमदारांच्या महनीय व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची रहाण्याची सोय बेळगाव शहर परिसरातील उच्च हॉटेल्स मध्ये करण्यात आली होती त्यासाठी 4.42 कोटी खर्च झाले होते.या शिवाय या सगळ्यांच्या प्रवास खर्च म्हणून 2 कोटी 61 लाख खर्च झाले होते बेळगाव शहरा पासून केवळ 8 की मी अंतरावर सुवर्ण सौध आहे एकसाठी दिवसाला प्रवासाला 2500 रुपये खर्च दाखवला गेलाय.
राहण्याची जेवण्याची सोय असलेल्या हॉटेल मध्ये फेअर फिल्ड मेरियोट 60 लाख 77 हजार,यु के 27 47 लाख 46 हजार,हॉटेल कीर्ती 31 लाख 38 हजार, हॉटेल इफा 22 लाख 50 हजार, हॉटेल सन्मान डीलक्स 20 लाख 82 हजार असे खर्च झाले आहेत. दहा दिवसांच्या बेळगावातील राज्य सरकारच्या अधिवेशनात सरकारने प्रत्येक तासाला अंदाजे सरासरी 3 लाख 37 हजार रुपये खर्च केले आहेत अशीही माहिती आर टी आय मधून समोर आली आहे.
बेळगावात झालेल्या अधिवेशनांचा खर्च असा आहे
2013 – 8 कोटी
2014 – 14 कोटी
2015 – 13 कोटी
2016 – 16 कोटी
2017 – 31 कोटी
2018 – 13.85 कोटी