गॅंगवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण झाल्याची घटना जरी खरी असली तरी त्या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही.केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी करण्यात येत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बदनामीचे षडयंत्र आखत आहेत असे असे स्पष्टीकरण गॅंगवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते शिवा चौगुले यांनी दिले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण झालेल्या प्रकरणाचा तपास पोलीस योग्य रित्या करत आहेत या प्रकरणाचा पीडित मुलीशी किंवा मुलाशी माझे व माझ्या नातेवाईकांचा कोणतही संबंध नाही. मनपा निवडणुकीच्या तोंडावर काही जणां कडून मला या प्रकरणात गुंतवून केवळ सोशल मीडियावर बदनामी केली जात आहेत असा निर्वाळा चौगुले यांनी दिला आहे.
नगरसेवक म्हणून आम्ही या प्रभागात अनेक विकास कामे राबवली आहेत नगरसेवक म्हणून आमच्या प्रभागात केलेलं काम काही विघ्न संतोषीच्या डोळ्यात खुपसत आहे त्यामुळे नावाची बदनामी करण्यासाठी हा कुटील डाव विरोधात आखत आहेत. सोशल मीडियात बदनामी करणाऱ्या वर भावी काळात मानहाणीचा दावा दाखल करू असा देखील इशारा त्यांनी दिलाय.