शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौडीची व्याप्ती बेळगाव शहरात वाढत आहे. दौडीतील सहभाग जोरदार वाढत आहे. पूर्वी फक्त युवकांची दौड होती पण आता महिला आणि युवती सुद्धा या दौडीत सहभागी होत आहेत.
दौडची संकल्पना पटल्याने बेळगाव शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला काही ठराविक तरुण दररोज दौडीत सहभागी व्हायचे पण आता बेळगाव शहरातील सर्वच भागातील युवक, महिला आणि लहान मुले दसर्यात या दौडीची आनंद घेत असतात. हा सहभाग रोज वाढत आहे. दौडीची महती अशी वाढत आहे.
दुर्गामाता दौड मध्ये सहभागी होऊन काय साध्य होते असा प्रश्न काही नागरिक विचारत असतात. या दौडीमुळे रोज पहाटे लवकर उठण्याची सवय लागते. नियमित कर्मे करून शरीर सुदृढ करण्याकडे लक्ष वेधले जाते आणि त्यातून नियमित पणे हा दिनक्रम ठेवल्यास तरुण पिढी सुदृढ होऊ शकते.
फक्त दौडीच्या काळात पळण्यासाठी येणारे अधिक आहेत. यावर्षी तर संख्येत वाढ झाली असून शेवटच्या दिवशी ही गर्दी आणखी वाढणार आहे. दौडीत पाळणाऱ्यांपेक्षा सजावट करून दौडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज तरुण आणि महिला वर्ग बेळगावातील संस्कृतीचा आनंद देत आहे.
आजच्या कॅम्प भागात दौडी ला उदंड प्रतिसाद लाभला हजारोंच्या संख्येने दौडीत सहभागी होऊन युवा वर्गाने दौड यशस्वी केली. प्रामुख्याने कॅम्प भागात निघालेली दौड सर्वांचे मन जिंजून घेतली .सर्व धर्मीयांकडून होणाऱ्या स्वागत मुळे दौडी ला अजून महत्व प्राप्त झाले दौडी मध्ये पारंपारीक वेषभूषा करून सहभागी झालेला युवा वर्ग लक्षवेधी ठरला होता
प्रारंभी शिवतीर्थ मिल्ट्री महादेव येथून मराठा लाईट इन्फन्ट्री चे कर्नल बी एस घेवारी यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्ती चे पूजन करून दौडीस प्रारंभ करण्यात आला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गा माता दौड च्या जागराने अवघ्या बेळगाव परिसतात चेतन्यादायी वातावरण निर्माण झाले आहे .छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषाने बेलगावकारांची पहाट सुरू होत आहे .
कॅम्प परिसरातून निघालेल्या या दौडीत शिवरायांचा अखंड गजराने परिसर दुमडून गेला होता . ठिकठिकाणी सुवासिनींनी आरती ओवाळून परम पवित्र भगव्या ध्वजाचे पूजन केले.शंभू जत्ती मठात दुर्गा माता मंदिरात दौडीची सांगता करण्यात आली या वेळी माजी नगरसेविका लालन प्रभू उपस्तीत होत्या.
उद्या ची दौड
श्री दुर्गा माता मंदिर बसवेश्वर चौक ते श्री मंगाई देवी मंदिर वडगांव.