बेळगावात दुर्गामाता मूर्ती विसर्जन करताना बुडून एकाचा मृत्यू झाला आहे राघवेंद्र मनोहर वेरणेकर वय 42 संभाजी नगर वडगांव असे बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मंगळवारी रात्री नवीन कपिलेश्वर तलावात दसऱ्याच्या निमित्ताने प्रस्थापित केलेल्या दुर्गामातांच्या अनेक मूर्तींचे विसर्जन झाले होते.दुर्गामाता विसर्जन करायला गेला होता त्यावेळी तो तलावात उतरला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. खडे बाजार पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मंगळवारी रात्री मनपाच्या वतीनं या तलावात मूर्ती विसर्जन करताना कोणतीच सोय केलेली नव्हती अनेक उत्तर भारतातील बेळगावात वास्तव्यास असलेले आणि स्थानिक मंडळ येऊन दुर्गा देवी मूर्तींचे विसर्जन करत होते.गणेश विसर्जन वेळी क्रेन व स्विमिंग करणारे अनेक जण असतात काल मात्र मनपाकडून तशी व्यवस्था केली नव्हती. मनपाचे कुणीही या ठिकाणी नव्हते मनपाच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेलाय असा आरोप केला जात आहे.
#durgadevivisarjan
#khadebazarpolicestation