सरकारी अधिकाऱ्यांना एसीबी अधिकारी आणि प्रेस रिपोर्टर असल्याचे सांगून ब्लॅकमेल करणारा अतुल कदम याला अटक करून हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन खात्यातील कार्यालय अधीक्षक शरणप्पा कल्लापा हुग्गी यांना 25 आणि 27 तारखेला फोन करून तुमच्या विरुद्ध तक्रार आली असून त्यासाठी काही कारवाई करायची नसेल तर आम्हाला भेटून सेटलमेंट करा असा फोन आला होता.
त्यासंबंधी हुग्गी यांनी तक्रार नोंदवली होती.त्यानुसार मार्केट पोलिसांनी तोतया एसीबी अधिकारी आणि प्रेस रिपोर्टर म्हणून सांगणाऱ्या अतुल विश्वास कदम याला अटक केली आहे.
त्याचा साथीदार झाकिरहुसेन मणियार हा फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.अतुल विश्वास कदम याला अटक करून चौकशी केल्यावर ब्लॅक मेलिंगचे हे जाळे असून यात आणखी काही व्यक्ती गुंतल्याची माहिती समोर आली आहे.अतुलची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून अन्य व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.