बेळगावच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर म्हणून शशिधर नाडगौडा मागील सात वर्षांपासून आपली पाळेमुळे रुतून बसलेल्या महानगरपालिकेतून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. डॉ. शशिधर नाडगौडा हे जनावरांचे डॉक्टर असून त्यांच्या जागी आता बेळगावकरांना माणसांचा डॉक्टर मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून त्यांची बदली योग्यच असल्याचे मत अनेक जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
डॉक्टर नाडगौडा हे प्रतिनियुक्तीवर महानगरपालिकेत आले होते. मात्र तब्बल सात वर्ष सेवा बजावूनही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा कारभार निदर्शनास आला नाही. प्रत्येकाकडून साटेलोटे करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नाडगौडा यांची बदली काहींच्या जिव्हारी लागली असून नागरिकातून मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नाडगौडा हे त्यांच्या मूळ खात्यात रुजू झाले असून प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासक अमलान बिश्वास यांच्या सूचनेवरून शशिधर नाडगौडा यांना महानगरपालिकेतून मुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या उचापती आणि आक्रमक स्वभाव यामुळे अनेक आतून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यांची बदली झाल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहेत. मात्र बेळगाव महानगरपालिकेला माणसांचा डॉक्टर मिळाल्याने समाधान ही तेवढीच व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाशी संबंधित उपकरणांच्या खरेदी वरून त्यांनी बराच गैरकारभार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रारी दाखल करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना हाताशी धरून आपली पोळी भाजून घेणाऱ्या नाडगौडा यांची तातडीने तडकाफडकी बदली करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नाडगौडा यांच्या बदलीचा आदेश आल्याने बेळगाव करातून आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचेही दिसून आले. 2012 साली महानगरपालिकेत नाडगौडा यांची वर्णी लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत बेळगावकरांच्या आरोग्य जनावरांच्या डॉक्टरांच्या हातातच होते. हे वास्तव्य अनेकांना दिसून आले तरी माझे कोण काय करणार अशा अविर्भावात वावरणाऱ्या आणि नको त्या प्रकरणात गुंतलेल्या डॉक्टर शशिधर नाडगौडा यांना हे चांगलेच महागात पडले आहे.