समाजकल्याण मंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी संगमेश्वर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी स्वयंपाक घरात जावून तेथील पाहणी केली.तेथे तयार करण्यात आलेल्या उप्पीटचा स्वादही कारजोळ यांनी घेतला.विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे भोजन,नाश्ता द्या.विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या असेही कारजोळ यांनी वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधून कारजोळ यांनी माहिती घेतली.यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके त्यांच्या समवेत होते.जिल्हाधिकारी डॉ एस बो बोमनहळळी यांनी देखील हॉस्टेलची पहाणी केली होती.