दोन महिन्यापासून अधिक काळ अखंड बरसणाऱ्या पावसाने गेली दोन दिवस विश्रांती घेतल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. दिवाळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी झाली असून कोट्यवधींची उलाढाल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ही माहिती केवळ दुपारपर्यंत असून यापुढेही आणि कोट्यावधींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारातून व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळी म्हणजे गोड-धोड नवीन कपडे, फटाके, आकाश दिवा, भेटवस्तू अशा विविध वस्तूंची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. मात्र दिवाळीच्या पाडव्यानिमित्त सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू चांदी यासह इतर वस्तू खरेदी करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहिती मिळाली आहे.
गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. सकाळपासूनच खरेदीसाठी सराफी पेढ्या फुलल्या होत्या. नागरिकांची पसंती घेऊन अनेकांनी विविध कलाकृती तयार करून पिढ्यांमध्ये ठेवल्या होत्या. या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर इलेक्ट्रॉनिक मध्येही टीव्ही, मोबाईल यासह इतर वस्तू खरेदी करण्यावर नागरिकांनी भर दिला होता. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदी व अधिक प्रमाणात भर दिल्याने काही ठिकाणी या वस्तू कमी पडत असल्याची माहितीही मिळाली.
रविवारी नरक चतुर्थी व लक्ष्मीपूजनाचा सोहळा आणि सोमवारी पाडवा आल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी लहान मुले युवक-युवतींचे कपडे महिलांसाठी साड्यांचे विविध ऑफर्स कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून सोने-चांदी खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी उपस्थित होते. त्यामुळे बाजारपेठ पाडव्याच्या निमित्ताने फुलून गेल्या होत्या.
पाडव्यासाठी इलेक्ट्रॉनिक बाजारातही गृहपयोगी वस्तू टीव्ही फ्रीज मोबाईल दुचाकी व चारचाकी वाहने यांच्या विविध वस्तूंचे ऍडव्हान्स बुकिंग ही करण्यात आले होते. स्वप्नातल्या घरांसाठी अनेकांनी बांधकाम व्यवसायाकडे माहिती घेण्यासाठी सहकुटुंब लोक पोचले होते. या साऱ्या खरेदी शुभमुहूर्तावर म्हणून पाडव्यादिवशी करण्यात आल्या. यावर्षी ओला दुष्काळ परिस्थिती असतानाही नागरिकांनी खरेदीवर भर दिला.