दिवाळी हा सण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच तिमिरातुनी तेजाकडे नेणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणाच्या असंख्य वैशिष्ट्य आहेत. साजरा करण्याच्या पद्धतीत दीपावली दिव्यांची ओळ किंवा पंगतीला विशेष महत्त्व आहे. आकाश कंदिलाचा झगमगाट पण त्यांची सुंदर दीपमाला, आकर्षणाची रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी हे सारे काही या सणाच्या निमित्ताने पहावयास मिळते. प्रत्येकाला आनंदित देणारा सण म्हणजे दीपावली…
प्रत्येक दारात आकाश कंदील लटकण्याचा हा सण आकर्षक असतो. विविध आकारातील आकाशातील रंगत ठरते. जे दिवाळी साजरी करतात ते आकाश कंदील लावतात. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सर्वत्र आकाशकंदील दिसू लागले आहेत. दिवाळी सण आला की पणत्यानाही आकाश कंदील इतकेच महत्त्व आहे. त्यामुळे सध्या संख्याही लावण्या तसं म्हणून तिकडे पाहिले जाते.
सध्या शहर आणि परिसरात दिवाळीनिमित्त फराळाचा मोठा दरवळ निर्माण झाला आहे. अनेकदा बाहेरील पार्सल वरच अधिक भर देत आहेत. घरात करण्यात येणारा फराळ हा आता घरात होत नसून बाहेर काही मंडळाने तयार करून स्टॉल मांडले आहेत. या ठिकाणी ही चकली चिवडा लाडू करंजी आधी फराळाचे साहित्य उपलब्ध होत आहेत. त्यामुळे दिवाळी आता मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे.
भारतीय संस्कृतीतील दिवाळी हा सण महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. गरीब असो वा श्रीमंत सर्वजण या तीन-चार दिवसांच्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आपल्या परीने सणाचा आनंद लुटतात. दिवाळी हा दिव्यांचा सण घराघरात साजरा केला जातो. सर्वत्र दिवाळीमध्ये दीप उजळून सर्वांच्या मनातील अंधाराला काहीसे दूर करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. सध्या या सणाला सुरुवात झाली असून सगळ्यांची धावपळ सुरू झाली आहे.