Thursday, December 19, 2024

/

पोलिसांनी हॉस्टेलची करावी तपासणी

 belgaum

बेळगावमधील सरकारी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल बाबत तक्रारी आल्या आहेत.होस्टेलमध्ये हाणामाऱ्या होत असून इतरही अनेक बाबी घडत आहेत.बाहेरील व्यक्ती येऊन गोंधळ घालण्याचे प्रकार देखील घडत आहेत.

यासाठी होस्टेलच्या वार्डननी आपल्या भागातील पोलीस ठाण्यात एक पत्र देऊन पोलिसांकडून नियमित हॉस्टेलची तपासणी करून घ्यावी असा आदेश जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी बजावला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहात झालेल्या बैठकीला वरिष्ठ सचिव जी.कुमार नायक उपस्थित होते.यावेळी बेळगाव जिल्ह्यात आणखी हॉस्टेलची आवश्यकता असून मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी कुमार नायक यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.