सध्या क्यार या वादळामुळे अनेकांना फटका बसला आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून पावसाने जोर केला असला तरी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. नुकतीच बेळगाव येथील प्रवासी चेन्नईला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या प्रतीच्या प्रवासाला चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. गोव्याला ते उतरणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांना बेंगलोर येथे सोडण्यात आले आहे.
गोव्याहून बेळगावला येण्याचा त्यांचा बेत होता. मात्र खराब हवामानात असल्यामुळे विमान पायलटने गोळ्याकडे येताच हवेत तीन गिरक्या मारून पुन्हा बेंगलोरकडे विमान उतरविले. त्यामुळे हवामानाचा फटका प्रवाशांना बसला आहे. या विमानातील साऱ्यांनाच प्रवाशांना बेंगलोरकडे उतरविण्यात आले आहे.
शुक्रवारी पहाटे चार पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास ऐंशी प्रवाशांना घेऊन गोव्याला जाणारे विमान चेन्नई मधून उडान केले होते. सकाळी सात च्या सुमारास ते विमान उतरणार होते. त्यावेळी हवामान खराब झाल्याने विमानतळा भोवती तीन घिरट्या घालून पायलटने थेट बेंगलोरला नेले आणि तेथे उतरविले
खराब हवामानाचा मुळे गोव्या एवजी सर्व 80 प्रवाशांना बेंगलोरला उतरविण्यात आले. यामध्ये गंगाधर पाटील, तुकाराम पाटील, नारायण कोरे, प्रकाश पावले आधी बेळगाव येथील प्रवाशी प्रवास करीत होते. हवामानामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.