बेळगाव जिल्हा पंचायत इथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. मात्र या बैठकीला पोलिसांनी पत्रकार व अधिकाऱ्यांना अडविले. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना आडवत असाल तर बैठक काय कामाची असा असवली काही पत्रकारांनी यावेळी केला आहे.
बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्हा पंचायत इथे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना किती मदतनिधी पोहोचविला आहे आणि किती पोचवायचा आहे यावर गंभीर चर्चा करण्यात येणार होती. याचबरोबर अजून किती सर्वे करायचा आहे, याबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात येणार होती.
मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा बैठक घेण्यास सुरुवात केली. मात्र आत जाण्यास पत्रकार अधिकार यांना परवानगी देण्यात न आल्याने एकच गोंधळ माजला होता. ज्यांच्याकडे ओळखपत्र आहेत त्यांनीच आत प्रवेश करावा अशी अट पोलिसांनी घातली होती. त्यामुळे पोलिसात आणि पत्रकारात काही काळ वादावादी झाली.
पत्रकारांनी संतापून मुख्यमंत्र्यांनाच फोन करतो असेही सांगितले. त्यामुळे थातूरमातूर उत्तर देऊन पोलिसांनी काहीना जाण्यास मुभा दिली. मात्र अधिकारी ताटकळत थांबले होते. अधिकारी यांनी पत्रकार नसतील तर मुख्यमंत्री कोणाची भेट घेणार आहेत? असा सवाल पत्रकारांनी पोलिसांना विचारला. कालांतराने यावर पडदा टाकून आत प्रवेश करण्यासाठी पोलिसांनी सांगितले त्यानंतर हा वाद मिटला आहे.
दरम्यान बेळगाव विमान तळावर मुख्यमंत्री येडीयुरापा यांना गोकाक वेगळा जिल्हा करा असें निवेदन देण्यात आले आहे पूर ग्रस्तांना मदत जिल्ह्याचे विभाजन आदी गोष्टीवर मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.शुक्रवारी सकाळी 9 वाजता जनतेच्या तक्रारी स्वीकारणार आहे.