समुद्रात आलेल्या क्यार चक्रीवादळामुळे केवळ किनारपट्टी भागातच नव्हे तर अन्य भागातही त्याचे परिणाम जाणवत आहेत.सध्या बेळगाव आणि परिसरात ऑक्टोबर महिना संपायला आला तरी पावसाळा सदृश्य स्थिती आहे.पाऊस संपला म्हणून सुटकेचा निःश्वास जनता सोडत असतानाच आठवड्यापासून पाऊस बरसत राहिलाय.
गुरुवार पासूनच हवेत कमालीचा गारठा निर्माण झालाय.गारठ्या बरोबरच पाऊसही सुरू आहे त्यामुळे हवामान खूप विचित्र झाले आहे.त्यामुळे सर्दी,खोकला,ताप याचे अधिक रुग्ण दवाखान्यात पाहायला मिळत आहेत.शुक्रवारी सकाळपासून पाऊस सतत सुरू असल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर पाऊस आल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर झालाय.सूर्यदर्शन देखील शुक्रवारी दिवसभरात झालेले नाही.कपड्यांची खरेदी,फटाके,आकाश कंदील ,फराळाचे साहित्य यांची खरेदी अद्याप बऱ्याच जणांची राहिलेली आहे.दुकानदार देखील पाऊस उघडीप देईल आणि ग्राहक खरेदीसाठी येईल याच्या प्रतीक्षेत आहेत.