कॅम्प पोलिसांनी गुरुवार दिनांक 17 रोजी एका संशयित आरोपीला दारूविक्री प्रकरणी अटक केली होती. मात्र चोवीस तासाच्या आत या संशयित आरोपीला न्यायालयात हजर न केल्यामुळे न्यायालयाने कॅम्प पोलिस स्थानकात चांगलाच दणका दिला आहे. कोणत्या कारणासाठी तुम्ही न्यायालयात हजर केला नाही? असा प्रश्न कारणे दाखवा नोटीस बजावून विचारल आहे. त्यामुळे कॅम्प पोलीस चांगलेच अडचणीत आले आहेत.
कोणत्याही संशयित आरोपीला न्यायालयात हजर करायचे असेल तर त्याला ताब्यात घेतल्यापासून 24 तासाच्या आत हजर करणे गरजेचे असते. मात्र पोलिसांनी चोवीस तासानंतर एका संशयित आरोपीला हजर केले आहे. हे प्रकरण पोलिसांनी चांगलेच अडचणीत आणणारे ठरले आहे. संबंधित संशयित आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात त्याची बाजू मांडत चोवीस तासानंतर हजर केल्याचे न्यायाधीशांसमोर सांगितले.
या प्रकरणी वकिलाने पोलिसांच्या विरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या अर्जाची दखल घेत न्यायाधीशांनी त्या पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चोवीस तासाच्या आत आरोपीला हजर न केल्यामुळे वकिलांनी ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन संशयित आरोपीचा जामीन अर्ज तातडीने मंजूर करावा व संबंधित पोलिस स्थानकाला नोटीस बजावावी अशी मागणी न्यायालयासमोर केली. आरोपीची बाजू उचलून धरत न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून त्या पोलिसांना चांगलाच दणका दिला आहे.
कॅम्प पोलिसांनी गुरुवार दिनांक 17 रोजी गोवा बनावटीच्या दारूविक्री प्रकरणी प्रवीण जाधव याला अटक केली होती. सायंकाळी साडेसहा वाजता त्याला अटक करण्यात आली होती. मात्र 24 तास उलटल्यानंतरही त्यांनी न्यायालयासमोर हजर करण्यात आले नाही. यामुळे वकिलाने पोलिसांच्या या प्रकाराबद्दल हरकत घेऊन न्यायालयात अर्ज दाखल केला जे एम एफ सी तृतीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याप्रकरणी पोलिसांना कारने दाखवा नोटीस बजावली आहे. संशयित आरोपीच्यावतीने वकील श्रीधर मुणगेकर आणि वकील अशिष कट्टी यांनी काम पाहिले आहे.