कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा हे बुधवारी महाराष्ट्रात प्रचारासाठी जाणार होते.जत येथे जाण्यासाठी ते सांबरा विमानतळावर सकाळी साडेआठला बेळगावहून गेले पण बराच वेळ झाला तरी हेलिकॉप्टर आले नसल्यामुळे त्यांनी संतापून उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी याना फोन करून चांगली कानउघाडणी केली.
आता अकरा वाजले आहेत.आता तिथे येवून काय करायचे?किती वेळ वाट बघायची?माझी तब्येत बरी नाही.मी परत बंगलोरला जातो असे सवदीना सांगितले.त्यावर सवदी यांनी थोड्या वेळात हेलिकॉप्टर पोचते म्हणून सांगून क्षमायाचना केली.नंतर येडीयुरप्पा पुन्हा शासकीय विश्रामधामावर विश्रांतीसाठी निघून गेले.त्यामुळे भाजपची नेते मंडळी आणि अधिकारी यांना तिष्ठत थांबावे लागले.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा हे सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र भाजपसाठी अनेक ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी सोलापूर जत सांगली भागात प्रचार सभा घ्यायचे ठरवले आहे.सकाळी 11 नंतर ते हेलिकॉप्टर हुन महाराष्ट्रात रवाना झाले.