खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या नावाने आलेल्या पार्सल बॉक्सचा स्फोट झाला असून या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. हुबळी रेल्वे स्थानकावर सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे.
हुबळी रेल्वे स्थानकाच्या प्लॅट फॉर्म वर ही घटना घडली आहे घटनेत हुसेनसाब नायकवाले वय 22 रा. आंध्रप्रदेश असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव असून युवकावर किम्स इस्पितळात उपचार सुरू आहेत. बॉक्स मध्ये स्फोट होताच रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार बॉक्स प्लॅट फॉर्म वर होता तो उघडायला गेला असता स्फोट झाला आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन स्फोट नेमका कशाचा आहे याचा तपास सुरू झाला आहे. अजून या घटनेचे नेमके कारण देखील स्पष्ट झाले नाही.
कोणतीही बेवारस वस्तूला हात लावल्याने ही घटना घडली काय याचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान अंजलीताई निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण या घटनेशी अनभिज्ञ असून मीडिया द्वारे मला याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसा पूर्वी कोल्हापूर हायवे ब्रिज खाली बेवारस वस्तूला पकडल्याने स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला होता त्या नंतर दोन दिवसात हुबळी स्थानकावर हा ब्लास्ट झाला आहे.