बेळगाव मनपाच्या हद्दीतील अनेक तलावाचे पाणी दूषित बनले असून मासे मृत्युमुखी पडत आहेत कपिलेश्वर तलावातील वेगवेगळ्या नमुन्यांचे हजारो मासे मृत्युमुखी पडलेली घटना ताजी असतानाच जुने बेळगाव या उपनगरातील तलावात देखील मोठमोठे मासे मृत्यूमुखी पडत आहेत.
जुने बेळगावातील हा तलाव ग्रामस्थांच्या ताब्यात आहे या तलावात जलपर्णी वाढली आहे त्यातच तलावाकडे ग्रामस्थांनी व शासनांनी दुर्लक्ष केल्याने पाणी दूषित बनलं आहे.गणेश विसर्जन साठी वेगळा तलावा बनवण्यात आलाय त्यातील पाणी झिरपून या तलावात आलं की काय त्यामुळे हे पाणी दूषित झालं असेल अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
काल पासून दररोज या तलावात अंदाजे आठ किलो वजनाचे तीस हुन अधिक मासे मरून तरंगत आहेत गावातील युवकांनी तरंगत असलेले मासे बाहेर काढले आहेत मनपाने या तलावा कडे लक्ष देऊन दुषित झालेलं पाणी पुन्हा स्वच्छ कसं करता येईल तलावात असणाऱ्या जलचर प्राणी मास्यांना कसं जगवता येईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे.