Thursday, December 19, 2024

/

हवाई मार्गे बेळगाव थेट जोडणार मध्यप्रदेशला

 belgaum

दिवसेंदिवस बेळगाव विमान तळावरून विमान सेवा उडानांची संख्या वाढतच असून लवकरच बेळगाव ते थेट इंदूर विमानसेवा सुरू होणार आहे.आगामी हिवाळा मोसमात होणाऱ्या उडानसाठी बेळगाव ते इंदूर या रूट ला डी जी सी ए कडून (Directorate General of Civil Aviation DGCA).परवानगी मिळाली आहे.
बेळगाव हुन मध्यप्रदेश या अगोदर जबलपूर व्हाया मुंबई कनेकटिंग होते स्पाईस जेट कडून बेळगाव मुंबई त्या नंतर मुंबई ते जबलपूर अशी सेवा सुरू आहे आता स्टार एअर ची बेळगाव हुन थेट अहिल्याबाई बाई होळकर विमान तळ इंदूर पर्यंत उडान तीन योजने अंतर्गत विमान सेवा सुरू होणार आहे.
नवीन हिवाळी वेळापत्रक आगामी ऑक्टोबर ते 28 मार्च 2020 पर्यंत आहे.या हिवाळी मोसमात बेळगाव इंदूर रूटला परवानगी मिळाली असून स्टार एअर कडून ही विमान सेवा सुरू होणार आहे. पुढच्यानोव्हेंबर महिन्यात ट्रु जेट कडून कडप्पा मैसुर,तिरुपती, हैदराबाद अशी उडान तीन योजनेत समविष्ट मार्गांची विमान सेवा सुरू होणार आहे मात्र बेळगावात अनुभवी कर्मचाऱ्यांचा कमतरतेमुळे सदर विमान सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे.

Star air
सध्या बेळगाव विमान तळावरून दररोज बंगळुरूला पाच ,मुंबई दोन,हैदराबाद दोन,पुणे आणि अहमदाबाद एक अशी अकरा विमाने झेप घेताहेत. पुढील महिन्यात ट्रु जेटची चार स्टार एअरचे इंदूरचे एक आणि सकाळीचे एअर इंडियाचे बंगळुरूचे एक बोईंग अशी संख्या वीस च्या जवळपास पोहोचणार आहे अशी माहिती विमान तळाच्या सूत्रांनी दिली आहे.

या विमाना व्यतिरिक्त दिल्ली चेन्नई आणि जयपूर किंवा जोधपूरला देखील पुढील काही महिन्यात बेळगाव हुन विमान झेप घेऊ शकते

उडानच्या तिसऱ्या टप्प्यात बेळगाव मधून या विमान मार्गांची निवड झाली होती ते खालील प्रमाणे आहेत.
बेळगाव ते सुरत- Ghodawat (Star Air)
बेळगाव ते जयपूर – Ghodawat (Star Air)
बेळगाव ते जोधपूर- Ghodawat (Star Air)
बेळगाव ते तिरुपती-Ghodawat (Star Air), Turbo Megha (TruJet)
बेळगाव ते अहमदाबाद-– Ghodawat (Star Air)
बेळगाव ते पुणे- Alliance Air
बेळगाव ते ओझर ( नाशिक)-– Ghodawat (Star Air)
बेळगाव ते नागपूर-– Ghodawat (Star Air)
बेळगाव ते हैद्राबाद-InterGlobe (Indigo), SpiceJet, Turbo Megha (TruJet)
बेळगाव ते काडाप्पा-Turbo Megha (TruJet)
बेळगाव ते मैसूर-Turbo Megha (TruJet)
बेळगाव ते इंदूर-– Ghodawat (Star Air)
बेळगाव ते मुंबई-SpiceJet, Ghodawat (Star Air)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.