भुवनेश्वर येथे झालेल्या ऍन्युअल ऑल इंडिया नॅशनल ओबेसिटी मीटमध्ये बेळगावच्या प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ डॉ.नीता देशपांडे यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा वंदना बंबवाले वक्तृत्व पुरस्कार (ओरेशन लेक्चर)बहाल करण्यात आला.
नॅशनल ओबेसिटी सोसायटीचे बन्सी साबू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.लठ्ठपणावर उपचार करणाऱ्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी बजावलेल्या डॉक्टरना हा पुरस्कार देण्यात येतो.
ऍन्युअल ऑल इंडिया नॅशनल ओबेसिटी मीटमध्येडॉ.नीता देशपांडे यांनी वजन कमी करण्यासाठी आहार की व्यायाम उपयुक्त या विषयावर व्याख्यान दिले.डॉ.नीता यांनी मधुमेह,आहार,रिव्हर्सल ऑफ डायबेटीज आणि वजन कमी करणे याविषयी बरेच संशोधन आणि अभ्यास केला असून त्यांचे संशोधन अनेक मेडिकल जर्नलमधून प्रसिद्ध झाले आहे.
देशातील आणि परदेशातील वैद्यकशास्त्रातील अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी व्याख्याने देऊन मधुमेह,आहार आणि वजन कमी करणे या विषयावर व्याख्याने दिली आहेत.