बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन जवळील मैदानात आज बेळगाव वासीयांनी सीमोल्लंघन केले. वतनदार रणजित चव्हाण पाटील घराण्याने सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्या. शहरातील सर्व थरातील नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.
चव्हाट गल्ली येथुन पालखी उत्सवास सुरुवात झाली. हुतात्मा चौक येथून शहरातील विविध पालख्या सह मिरवणूक निघाली आणि मराठी विद्यानिकेतन जवळील मैदानावर पोचली, तिथे सीमोल्लंघन करण्यात आले.
नंदी बैल मानाचा कटल्या आपट्याच्या पानाच्या ढिगाऱ्यात घुसला मग पारंपरिक पद्धतीनं सोन लुटलं.सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन विजया दशमी साजरा केला. यावेळी आमदार अनिल बेनके,पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार, उपायुक्त यशोदा वंटगुडी शहरातील पोलीस निरीक्षक उपस्थित.दसऱ्याला दरवर्षी मराठी विद्या निकेतन मैदानावर जत्रेचे स्वरूप येते.यावर्षीही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंच मंडळी मान्यवर उपस्थित होते.
कॅम्प येथील मिरवणूक आकर्षक
बेळगाव शहराच्या कॅम्प भागात तेलगू रहिवासी आणि इतर धर्मीय नागरिक दरवर्षी नवरात्रात दुर्गा मातेचे पूजन करतात.
दसऱ्याच्या दिवशी या मातेची मिरवणूक काढली जाते. पारंपारिक पेहराव आणि विविध सोंगे काढून तरुण दाखल झाले होते. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
गुरुवारी सायंकाळी पावसाने रिमझिम मारा केला यामुळे खरेदी आणि सोने लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची थोडी गैरसोय झाली.मात्र उत्साह होता.
दक्षिण बेळगावातील सीमोल्लंघन घुमटमाळ येथे
विजयादशमी दिवशी हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारूती मंदिरात सीमोल्लंघन कार्यक्रम झाला यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.वडगांव जुनेबेळगाव व अनगोळ येथील मानाच्या पालख्या वाजत गाजत आल्या त्याचं व भाविकांचे स्वागत मंदिराच्या आवारात ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले.यावेळी पारंपरिक पद्धतीनं सोन लुटण्यात आलं अंनगोळ वडगांव शहापूर भागातील हजारोच्या संख्येनी सहभाग दर्शवला होता.यावेळीअनेकांनी अल्लीपाक खाणे पसंद केले यावेळी घुमट माळ मारुती मंदिर ट्रष्टीनी स्वागत केले.