सोशल मीडिया आणि आर्थिक फसवणूक या बरोबरच मादक पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी सायबर क्राईम ,इकॉनॉमिक अँड नार्कोटिक पोलीस स्थानक बेळगावात कार्यरत असून याविषयी अधिक जणांना माहिती नाही. मार्केट पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस हे पोलीस स्थानक असून पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात हे येते.
फेसबुक,व्हाट्सअप,इन्स्टाग्राम आणि ई मेल यावर होणारी फसवणूक ,बदनामीकारक पोस्ट,अश्लील छायाचित्रे पोस्ट करून बदनामी कार्नेय बाबत या पोलीस स्थानकात तक्रार करता येते.या पोलीस स्थानकाचे अधिकारी म्हणून इन्स्पेक्टर यु.एच.सातेनहळ्ळी आहेत.
सोशल मीडियावरील फसवणूक,बदनामी याबद्दल येथे तक्रार नोंदवता येते.दुसऱ्या कडून होणारा क्रेडिट कार्डचा वापर,नोकरीसाठी ऑनलाइन केली जाणारी फसवणूक, ओ एल एक्स वर केली जाणारी फसवणूक याबद्दल येथे तक्रार नोंदवता येते.
गुगल पे,फोन पे आणि मोबाईल पे द्वारे जर चुकून दुसऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तक्रार नोंदवावी.आपला ए टी एम कार्डचा पासवर्ड कोणालाही देऊ नये असे आवाहन पोलीस इन्स्पेक्टर यु.एच.सातेनहळ्ळी यांनी जनतेला केले आहे.