सोमवारी पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी रविवारी झालेल्या पावसामुळे हजारहून अधिक एकरातील बेळगावचे प्रसिद्ध बासमती भात पाण्याखाली गेले आहे.
त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील आपल्या स्वाद आणि रुचिमुळे ख्याती मिळवलेल्या बासमती भाताचे उत्पादन यंदा घटणार असल्याचे प्रगतशील शेतकरी राजू मरवे यांनी दिली.त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करत असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.
पावसाळ्यात पडला नसेल इतका ढगफुटी झाल्यासारखा पाऊस रविवारी पडल्यामुळे येळ्ळूर,धामणे,शहापूर शिवारातील भातशेती पाण्याखाली गेली.त्यामुळे तयार होत आलेल्या भातपिका वरून आता पाणी वाहत आहे.एक दोन दिवसात पाणी पूर्ण ओसरले नाही तर भात पीक पूर्ण कुजून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
बेळगाव वडगांव धामणे येळ्ळूर आणि पूर्व भागात मोठया प्रमाणात बासमती पीक घेतले जाते सध्या हे भात पीक शेतात उभे आहे कालच्या पावसाने अनेक ठिकाणी भात पडले आहे.