सोळा वर्षापासून सोने तारणावर ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या मंजुनाथ अणवेकर यांच्या अणवेकर गोल्ड या संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी संपन्न झाला.
पार्वती निवास, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड टिळकवाडी येथे संपन्न झालेल्या या उद्घाटनप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वैभव वेरनेकर, दैवज्ञ बँकेचे चेअरमन सुरेश पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री मंजुनाथ व सौ मेघना
अणवेकर यांच्या हस्ते महालक्ष्मी पूजन करण्यात आले. दिवसभरात नागरिकांनी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. त्या सर्वांचे स्वागत अणवेकर गोल्ड च्या संचालक व कर्मचाऱ्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना अणवेकर गोल्डचे संचालक मंजुनाथ अणवेकर म्हणाले की, सोळा वर्षांपूर्वी आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत आम्ही एक लाखाहून अधिक ग्राहकांना योग्य दराने त्यांच्या सोने तारणावर कर्ज दिले.या व्यवसायाची सुरुवात महाद्वार रोड येथे करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी अणवेकर गोल्ड ची शाखा रामलिंग खिंड येथे सुरू करण्यात आली. तिथे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे ग्राहकांच्या आग्रहास्तव आम्ही टिळकवाडी येथे तिसरी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांचा विश्वास ,आमची व्यवहारातील पारदर्शकता आणि अखंडित ग्राहक सेवा हेच आमच्या यशाचे गमक आहे असे ते म्हणाले
या संस्थेचे ग्राहक केवळ बेळगाव जिल्ह्यातच आहेत असे नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि गोव्यातून अनेक ग्राहक नियमितपणे कर्ज घेण्यासाठी येतात.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या तारणावर सर्वाधिक दराने कर्ज देणारी अणवेकर गोल्ड ही एकमेव संस्था आहे. तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दसऱ्याचे मुहूर्तावर सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांना प्रति ग्रॅम वर पंचवीसशे रुपये कर्ज देण्यात आले. बारा महिन्यानंतर कर्ज भरण्याची सुविधा देणारे अणवेकर गोल्ड एकमेव आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले .इतर संस्थात ठेवलेले सोने सोडून घेण्याची सुविधाही अणवेकर यांच्याकडे आहे त्यामुळेच अणवेकर गोल्ड ही लोकादरास पात्र ठरली आहे