शहरासह जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये सध्या डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डासांमुळे होणाऱ्या या आजारावर योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने आतापर्यंत काही जणांचा मृत्यू ही झाला आहे. मागील काही महिन्यात शेकडो नागरिकांना याची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याची सावधानता बाळगणे गरजेचे असून याबाबत आरोग्य खात्याने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू झाला नंतर डेंग्यूच्या आजाराला सुरुवात होते. या वर्षी जरा उशिराने सुरुवात झाली असली तरी रुग्ण मात्र मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. डेंग्यूचे सात वाढू नये यासाठी गावागावात खबरदारी घेण्याची गरज निर्माण असताना आरोग्य खाते मात्र याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
डेग्यूची सात वाढू नये यासाठी गावागावात खबरदारी व उपायोजना करण्यावर भर देण्याची गरज असताना याबाबत साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागील महिन्याभरात शेकडो नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस येत आहे. शासकीय रुग्णालय बरोबरच खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार सुरू असताना डेंगू मुळे एका मुलीचा ही मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे याबाबत दक्षता घेणे गरजेचे ठरणार आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डासामुळे होत असल्याने डासांची उत्पत्ती होणाऱ्या गोष्टींचा नायनाट करण्याची गरज असते. मात्र या यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी इस्पितळातून डेंग्यूची लागण झालेल्यांच्या चाचण्या सुरू आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य खात्याने काळजी घेऊन योग्य ते पाऊल उचलण्याची गरज आहे. नागरिकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.