बेळगाव येथील सांबरा विमान तळातून दिवाळीच्या निमित्ताने एअर इंडिगोने बेळगाव हुन हैद्राबादला थेट विमान सेवा सुरू केली. बेळगावं बंगळुरू नंतर इंडिगोची ही बेळगाव हुन दुसरी विमानसेवा आहे मागील महिन्यात 8 सप्टेंबर रोजी गणेश उत्सवात बेळगाव बंगळुरू सेवा सुरू झाली होती.
रविवारी सायंकाळी विमान तळावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बेळगाव हैदराबाद दररोजच्या विमान सेवेचे उदघाटन एअर पोर्ट अधिकारी पी एस देसाई यांनी केले. विक्रम किल्लेकर आणि पराग भंडारे,इंडीगो चे अधिकारी नागेश आदी उपस्थित होते.
बेळगाव हैदराबाद ही दररोज विमानसेवा असून 74 सीट विमान क्षमता असलेल्या विमानात पहिल्या दिवशी 31 प्रवासी आले तर 51 हैदराबादकडे गेले. एअर इंडिगो चे 6E 7966/7968 विमान दररोज सायंकाळी 5:15 वाजता हैदराबाद कडे रवाना होणार आहे.
या अगोदर स्पाईस जेटची बेळगाव हैदराबाद ही नियमित विमानसेवा सुरू आहे त्यानंतर इंडिगोची ही दुसरी सेवा आहे. बंगळुरू, मुंबई नंतर हैदराबादला देखील बेळगावातुन एकाहून अधिक विमान सेवा जोडणारे शहर ठरले आहे. पुढील नोव्हेंबर महिन्यात मैसुर कडप्पा आणि तिरुपती साठी ट्रु जेट च्या तीन विमान सेवा उडान थ्री अंतर्गत बेळगाव हुन सुरू होणार आहे या शिवाय बेळगाव इंदूर देखील विमान स्टार एअर कडून झेप घेणार आहे .अश्या स्थितीत बेळगावं हुन विमानांची संख्या वाढतच आहे.