मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वकिलावर दादागिरी करणाऱ्या पी एस आय ला निलंबित करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने शनिवारी कामकाज बंद केलं होतं आणि घटनेचा निषेध करण्यासाठी कोर्टा समोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले.
शनिवारी सकाळी बेळगाव बार असोसिएशनच्या कार्यालयात पोलिसांच्या दादागिरीचा निषेध करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पोलीस उपनिरीक्षकाने वकीलावर केलेल्या दादागिरीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी चार वाजता कोर्ट आवारात बॅरिकेट्स लावून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता लोकांची अडवणूक करण्यात येत होती यावेळी अनेक नागरिकांची देखील पोलिसांशी बाचाबाची झाली होती त्यावेळी एका पोलीस उपनिरीक्षकाने इरफान बायल या वकिलांवर दादागिरी करून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता या घटनेचा निषेध बैठकीत करण्यात आला आणि कामकाज पकडून वकिलांनी आंदोलन छेडले .
यावेळी राणी चन्नममा चौक आणि आर टी ओ कडून रहदारी मार्गात बदल करण्यात आला होता परिणामी बस स्थानक आर टी ओ कडे ट्राफिक जाम झाले होते. टायर जाळून देखील वकिलांनी पोलिसी हल्ल्याचा निषेध केला.
वकिलावर दादागिरी करणाऱ्या पीएसआयला तात्काळ निलंबित करा आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करा अशी मागणी करत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता वकिलांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली जोपर्यंत पोलीस आयुक्त घेऊन ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत रास्तारोको सुरू होणार अशी भूमिका वकिलांनी घेतली होती एकूणच वकिलांवर असे हल्ले थांबवा अशी मागणी वकील करतायेत यावेळी बेळगाव वकील संघटनेच्या शेकडो सदस्यांनी या आंदोलनात सहभाग दाखवला होता यावेळी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
कोर्ट आवारात डी ऑफिस परिसरात बेशिस्त पार्किंग करण्यात येत असून यावरही पोलिसांनी नियंत्रण आणावे आणि शिस्तीचे पार्किंग करावे अशी मागणी देखील वकील संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे दुपारचे दीड वाजेपर्यंत हे वकिलांचा रस्ता रोको आंदोलन चालू चालू होतं जोपर्यंत पोलीस आयुक्त लोकेश कुमार येऊन देत नाही पीएसआय वर कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन करू अशी भूमिका वकीलांनी घेतली होती.