बेळगावातील के एल ई इंटरनॅशनल स्कुलचा अकरावीत शिकणारा मंदार मारुती देसुरकर याने ७६ व्या जगातील सगळ्यात लांब राष्ट्रीय खुल्या पोहण्याच्या स्पर्धेत आपली चमक दाखवली.
कोलकाता येथील भागीरथी नदीत मंदारने १९ किलोमीटर अंतर दोन तास दहा मिनिटात पार करून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले.२५ ऑगस्ट २०१९ रोजी कोलकाता येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील जलतरणपटू सहभागी झाले होते.
भागीरथी नदीत १९ किमी पोचल्यानंतर मंदारला आता वेध लागलेटनते पुढील वर्षी होणाऱ्या ८१ किमी पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याचे.प्रशिक्षक गुरू प्रसाद तंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार पोहण्याचा सराव करत आहे.शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक वर्गाने मंदारचे अभिनंदन केले आहे.