बेळगाव शहरातील गोंधळी गल्लीत राहणाऱ्या एका उदयोन्मुख युवा बॉडी बिल्डरचे दुचाकीवरून पडून अपघाती निधन झाले आहे. बुधवारी रात्री हा अपघात झाला आहे उदय भरमा होनगेकर वय 22 रा.गोंधळी गल्ली बेळगाव असे त्याचे नाव असून या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यातील बॉडी बिल्डरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री तो नानावाडी भागात मित्रांसोबत जोवयला गेला होता वेळ खूप होतो म्हणून सकाळी लवकर जिमला जायचे असे सांगून परतत असतेवेळी नानावडी जवळ दुचाकी स्लिप होऊन पडला त्यात त्याच्या डोक्याला मार लागला होता उपचारासाठी त्याला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
उदय हा बेळगाव शहरातील तरुण बॉडी बिल्डरांत उदयोन्मुख बिल्डर म्हणून प्रसिद्ध होता त्याने नुकताच मोरया श्री 2019 हा किताब पटकावला होता आणि उद्या मैसरू येथील दसरा स्पोर्ट्स मध्ये सहभागी होण्यासाठी जाणार होता. 24 फिटेनस क्लब मध्ये तो ट्रेनर म्हणून देखील काम करत होता.
त्याचे वडील भरमा होनगेकर हे गोंधळी गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक असून दत्त मंदिरा जवळ किराणा दुकान चालवतात. या अपघाता प्रकरणी रहदारी दक्षिण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.गुरुवारी दुपारी त्याच्या वर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.