सध्याच्या काळात मधुमेह आणि हृदयविकाराची संख्या वाढत आहे. भारतीयांमध्ये हृदयविकाराने कमी वयात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहेत .योग्य काळजी घेतली तर हृदयविकार विकार टाळता येतात अशी माहिती ज्येष्ठ रुदय रोग तज्ञ डॉक्टर सुरेश पट्टेद यांनी दिले आहे.
जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्ताने डॉक्टरनी ही माहिती दिली आहे. लवकरच भारत हृदयविकाराने त्रस्त नागरिकांच्या मोठ्या संख्येचा देश म्हणून ओळखला जाईल .जागतिक पातळीवर विचार केला तर भारतातील रुग्णांची संख्या वाढत आहे .
पन्नास वयोगटाच्या आतील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची संख्या वाढत आहे. नुकत्याच झालेल्या वैज्ञानिक अहवालानुसार ही आकडेवारी पुढे आली आहे.
मधुमेह नियंत्रणात नसणे ताण-तणाव वाढणे आणि इतर कारणांमुळे तसेच व्यायामाचा अभाव ताणतणाव त्यामुळे हृदयावर भार पडून हृदय विकार होतात .यासाठी साधी जीवनशैली आत्मसात करायची गरज आहे. छातीत दुखणे छातीवर ताण येणे छातीला त्रास होणे श्वास घेण्यास त्रास होणे असेच जर लक्षणे दिसली तर लगेच आपल्या हृदयाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.