बेळगाव शहरात सध्या सगळीकडे जिकडे पहावे तिकडे पाणी गळतीचे प्रकार सुरू आहेत. आनंद नगर वडगाव येथे दिवसभर गळलेल्या पाण्याचा, याचबरोबरीने गांधीनगर जवळील पाईपलाईन ला लागलेला गळतीचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत.
यावर्षी मुबलक पाऊस पडला आणि नदी नाले तलाव व पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे भरले याचा अर्थ असा नाही की पाणी कसे वाया घालवावे. आता उन्हाचा तडाखा वाढू लागला आणि लवकरात लवकर पाणी आटून जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पाणी वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे .पण याची काळजी घेतली जात नाही. उलट मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवण्यातच पाणीपुरवठा महामंडळ लक्ष देत आहे. असे म्हणावे लागत आहे.
पाणी सोडणाऱ्या प्रत्येक कर्मचारी पासून पाणीपुरवठा मंडळावरील प्रत्येक अधिकाऱ्याने याची दखल घेण्याचे मागणी बेळगावातील जनता करत आहे. पाणी जपून वापरायला पाहिजे मात्र ते वापरले जात नाही यामुळे सध्या समस्या होत आहेत .वाया जात असलेले पाणी बघून नागरिकांचे काळीज हलते मात्र पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना काही वाटत नाही. पाणी वाहून जाऊ देतात हे धोकादायक असल्याचे समजत आहे .याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी आहे.